१ जानेवारी एक संकल्प दिन

"खरी मजा वेळोवेळी आपल्याला कुठले संकल्प सोडावेसे वाटले ते पाहण्यात आहे. ते नाही पाळता आले म्हणून हताश होऊ नये. आपण अमुक अमुक करण्याचा किंवा न करण्याचा संकल्प सोडलाय हे सांगण्यातच तो जणु काय पार पाडलाय असा ध्वनी असतो." - पु.ल. देशपांडे

पु.ल. देशपांडे यांचा कालनिर्णय दिनदर्शिकेच्या जानेवारी १९८० महिन्याच्या पानामागे असलेला लेख.
स्रोत: https://www.kalnirnay.com/blog/मराठी-लेखणी/एक-जानेवारी-एक-संकल्प-दिन/

बोलावे आणि बोलू द्यावे

"आपण कितीही स्वतंत्र असल्याचा आव आणला तरी जीवनाच्या एका विराट नाटकातली आपण पात्र आहोत. इथे सगळेच संवाद पदरचे घालून चालत नाही. कुठल्या अज्ञात नाटककाराने ह्या रंगभूमीवर आपल्याला ढकललेले आहे याचा अजूनही कुणाला थांगपत्ता लागलेला नाही आणि एकदा एंट्री घेतल्यावर बोलल्याशिवाय गत्यंतर नाही. न बोलून सांगता कुणाला अशी अवस्था आहे." - पु.ल. देशपांडे

पु.ल. देशपांडे यांचा कालनिर्णय दिनदर्शिकेच्या जानेवारी १९७९ महिन्याच्या पानामागे असलेला लेख.
स्रोत:https://www.kalnirnay.com/blog/मराठी-लेखणी/बोलावे-आणि-बोलू-द्यावे/