१ जानेवारी एक संकल्प दिन

"खरी मजा वेळोवेळी आपल्याला कुठले संकल्प सोडावेसे वाटले ते पाहण्यात आहे. ते नाही पाळता आले म्हणून हताश होऊ नये. आपण अमुक अमुक करण्याचा किंवा न करण्याचा संकल्प सोडलाय हे सांगण्यातच तो जणु काय पार पाडलाय असा ध्वनी असतो." - पु.ल. देशपांडे

पु.ल. देशपांडे यांचा कालनिर्णय दिनदर्शिकेच्या जानेवारी १९८० महिन्याच्या पानामागे असलेला लेख.
स्रोत: https://www.kalnirnay.com/blog/मराठी-लेखणी/एक-जानेवारी-एक-संकल्प-दिन/

बोलावे आणि बोलू द्यावे

"आपण कितीही स्वतंत्र असल्याचा आव आणला तरी जीवनाच्या एका विराट नाटकातली आपण पात्र आहोत. इथे सगळेच संवाद पदरचे घालून चालत नाही. कुठल्या अज्ञात नाटककाराने ह्या रंगभूमीवर आपल्याला ढकललेले आहे याचा अजूनही कुणाला थांगपत्ता लागलेला नाही आणि एकदा एंट्री घेतल्यावर बोलल्याशिवाय गत्यंतर नाही. न बोलून सांगता कुणाला अशी अवस्था आहे." - पु.ल. देशपांडे

पु.ल. देशपांडे यांचा कालनिर्णय दिनदर्शिकेच्या जानेवारी १९७९ महिन्याच्या पानामागे असलेला लेख.
स्रोत:https://www.kalnirnay.com/blog/मराठी-लेखणी/बोलावे-आणि-बोलू-द्यावे/

ट्राय ट्राय बट नेव्हर क्राय

नापाश्या गरज्याला काय वाटतं चिंतू आणि त्याची बहिण पिंकीबद्दल?

प्रसाद कुमठेकर लिखित बगळा ह्या कादंबरीतील एक उतारा वाचला आहे. संपूर्ण कादंबरी उदगिरी बोलीत लिहिलेली आहे. वाचताना वेगळाच अनुभव होतो. मी रेकॉर्डिंग करताना भाषेची शैली जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. सुधारणेची गरज निश्चितच आहे. आपल्याकडून काही सुचना, सल्ले असल्यास त्यांचं स्वागत आहे.

Marathi Movie Checkmate

Marathi movie Checkmate (2008). Thanks to Mr. Sanjay Jadhav, the director of the film and Ms. Harshada Khanvilkar for giving me an opportunity to be a part of this movie.

In this movie I gave my voice to 2 different Characters. A foreign lady and a news anchor. I used American accent for the foreign lady.

संस्कृत भाषेबद्दल महत्त्वाचे (मालिका)

संस्कृत भाषेची थोरवी सांगणारी लेख मालिका डॉ. सत्चिदानंद शेवडे यांनी फेसबुकवर प्रकाशित केली होती. त्याच लेखमालिकेचे ध्वनीमुद्रण माझ्या आवाजामध्ये आपल्यासमोर सादर करत आहे: